प्रतिनिधी : राज्य कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी प्रकल्प निविष्ठा वाटप केले . गाडीखेल येथे मंडळ कृषी अधिकारी यमगर ,सरपंच बाळासो आटोळे, उप सरपंच शरद शेंडे यांच्या मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांना बाजरी पेरणी करताना गंधक ४ ग्रॅम (३०० मेश) प्रतिकिलो बियाणे त्यानंतर अॅझेटोबॅक्टर २५ मिली आणि पीएसबी २५ मिली प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन केले. पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर करावा. जेणेकरून बियाणे आणि खत पेरणीवेळी देणे शक्य होईल आणि पेरणी योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर होईल. त्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मौजे गाडीखेलवाडी येथे बाजरी मका बीजप्रक्रिया, तसेच मका उगवण क्षमता प्रात्यशिक करण्यात आले व पीएसबी, अॅझेटोबॅक्टर, नीम कीटकनाशक,बुरशीनाशक वाटप केले कृषि सहाय्यक , ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.