हरिभक्‍तीच्‍या हिरवाईत नटली, बारामती नगरीची वाट…
पाहूनी मन हरखून गेले, तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा थाट…

प्रतिनिधी – ​जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्‍या स्‍वागतासाठी बारामती नगर परिषदेने पालखी मुक्‍कामी शारदा प्रांगण या ठिकाणी 180 x 80 फुट लांबीचा शामियाना मंडप उभारणी केलेला आहे. तसेच पालखी दर्शनासाठी बॅरेगेटींग 500 फुट लांब सोय करण्‍यात आलेली आहे. पालखी मुक्‍कामाच्‍या ठिकाणी मैदानामध्‍ये मुरुम टाकुन लेव्‍हलींग, रोलींग करण्‍यात आलेले आहे. त्‍याच बरोबर पालखी मुक्‍कामी व मार्केट यार्डमध्‍ये वारक-यांना अंघोळ करण्‍यासाठी महिला व पुरुष स्‍वतंत्र शॉवरची सोय करण्‍यात आलेली आहे.
​शारदा प्रांगण व नगर परिषद परिसरात वारक-यांसाठी वैद्यकीय सुविधांची सोय करण्‍यात आलेली आहे. बारामती नगर परिषदेच्‍या कार्यक्षेत्रात जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्‍या स्‍वागतासाठी पाटस रोड ते शहरातील विविध भागातील सर्व रस्‍ते डांबरीकरण करुन पॅचवर्कचे काम करण्‍यात आलेले आहे. तसेच पालखी मार्गातील सर्व रस्‍ते साफसफाई करुन घेण्‍यात आलेले आहेत. पालखीला अडथळा निर्माण होणा-या झाडांच्‍या फांद्या छाटून घेण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍याच बरोबर निर्मल वारी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी 800 सिट मोबाईल शौचालयाची सोय करण्‍यात आलेली आहे, त्‍याठिकाणी विद्युत व्‍यवस्‍था, पाण्‍याची सोय केलेली आहे.
​तसेच पालखी मार्गावरील बांधकामाचा राडारोडा खडी, वाळू, माती, रस्‍त्‍याच्‍या साईडपट्ट्या साफ करुन घेण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच पालखीला अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे काढून घेण्‍यात आलेली आहेत. संपूर्ण शहरातील स्‍वच्‍छता केली गेली आहे. पालखी मुक्‍कमी निजर्तुंकीकरण करुन संपूर्ण शहरात तसेच दिंडी मुक्‍कामी मच्‍छरची औषध धुर फवारणी करण्‍यात आलेली आहे. त्‍याच बरोबर बारामती नगर परिषदेने पालखी आगमनाच्‍या दिवशी पूर्णवेळ पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेणेत आलेली आहे.
​स्‍वच्‍छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरात प्‍लास्टिक मुक्‍त बारामती, प्रदुषण मुक्‍त वारी, तसेच पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्‍यात येत आहे.
​जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज पालखी स्‍वागतासाठी प्रशासन सज्‍ज झाले असून सुरक्षितता व आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वच विभागांमार्फत कामकाज पूर्ण करण्‍यात आलेले आहे.
​जगतगुरु संतश्रेष्‍ठ श्री तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाल्‍यानंतर पालखीच्‍या पाठीमागे नगर परिषदेच्‍या माध्‍यामातून वारक-यांनी चहाचे ग्‍लास, फळांचे साली व पदार्थांची स्‍वच्‍छता करणेसाठी नागवडे वस्‍तीपासून ते पालखी मुक्‍कामी शारदा प्रांगण या ठिकाणापर्यंत साफसफाई करणेसाठी 150 कर्मचा-यांची तैनात करण्‍यात आलेली आहे. त्‍याच बरोबर बारामतीतून पालखी मार्गस्‍थ झालेनंतर पालखीच्‍या मार्गावरील व संपूर्ण शहरातील साफसफाईची फौज सतर्क ठेवण्‍यात आलेली आहे. या संपूर्ण पालखी सोहळ्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी साफसफाईच्‍या कामासाठी तसेच मोबाईल शौचालय व वारक-यांना अंघोळीसाठी दिशा दाखविण्‍यासाठी आपला सहभाग नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *