मौजे-जिरेगाव, तालुका- दौंड, जिल्हा- पुणे येथे दिनांक २६ जुन रोजी कृषी संजीवनी मोहीम च्या अनुषंगाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक अंगद शिंदे यांनी करुन उपस्थित शेतकऱ्यांना कृषी संजीवनी सप्ताह बाबत माहिती दिली.मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांनी पौष्टिक तृणधान्य दिवस व तृणधान्याचे महत्त्व, प्रक्रिया उद्योगातील संधी याबाबत मार्गदर्शन केले, अतुल होले कृषि सहाय्यक यांनी कृषि विभागाच्या विविध योजना, एम आर इ जी एस अंतर्गत फळबाग लागवड,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, महाडीबीटी योजना, याबाबत माहिती दिली, अझरुद्दीन सय्यद कृषि सहाय्यक यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन या बाबत मार्गदर्शन केले. संजय कदम कृषी पर्यवेक्षक पाटस 2 यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व विचारलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पोषणयुक्त सुरक्षित अन्न मिनी कीटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिरेगाव येथील नागनाथ शिंदे, सुमित पवार, हनुमंत खंडाळे आदी शेतकरी मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन कृषि सेवक संदीप सरक यांनी केले.