प्रतिनिधी – आधुनिक जीवनशैलीमुळे मानवाचे मातीशी नाते तुटत आहे. तो मातीपासून दूर होत चालला आहे. त्याला मातीचा स्पर्शही नकोसा वाटत आहे. म्हणून चिमुकल्यांना मातीचे महत्व समजण्यासाठी शनिवार दिनांक २५ /६ /२०२२ रोजी पोद्दार जंबो किड्स कसबा बारामती शाळेमध्ये त्यांना विविध प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले . लहान मुलांनी स्वतः मातीची छोटी मडकी तयार केली त्यासाठी त्यांना कुंभाराने व पालकांनी मदत केली. त्याच चिखलात चालण्याचा आनंदही यावेळी चिमुकल्यांनी लुटला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा पालकांनीही आस्वाद घेतला . या उपक्रमासाठी शाळेतील पर्यवेक्षिका इंसिया लोखंडवाला, प्रीतम तावरे, निशिगंधा पाटोळे या शिक्षिकांनी आणि सगळ्या सहायक स्टाफ ने नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *