ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हब च्या माध्यमातून मासिक पाळी : जनजागृती व सॅनिटरी नॅपकिन पॅडच मोफत वाटप

प्रतिनिधी – ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातून नाविन्य पूर्ण उपक्रम ”मासिक पाळी” विषयी जनजागृती करत सॅनिटरी नॅपकिन पॅड च मोफत वाटप केलं. आपल्या समाजात अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आहेत काही चांगल्या आहेत तर काही आपल्या समाजासाठी घातक पण चांगल्या परंपराच अनुकरण केलं पाहिजे आणि घातक परंपरेला मूठ माती देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे महाराष्ट्रा ला खरं तर मोठी संत परंपरा आहे. त्या संतांनी त्यांच अभंगांच्या रुपात जनमानसात जनजागृती करण्याचा प्रयत्न गेल्या शेकडो वर्षां पासून केला आहे. संत सोयराबाई मनातील शंका इथे स्फष्ट बोलु दाखवतात. सोयराबाई यांना हे प्रश्न पडले आणि त्यांनी बोलून सुद्दा दाखवले पण अशा घटना दुर्मीळ असतात स्त्रियांच्या मनातील प्रत्येक प्रश्न ओटांवर येईल ये शक्य नसतं म्हणूनच अशा घातक म्हणजे आपल्या स्त्री जातीशी निघाडीत ”मासिक पाळी” यावर बोलायला कोणी तयारच नसत यावर जनजागृती होणं अत्यंत गरजेच आहे अनेक सेवाभावी संस्था यासाठी काम करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून Baramati Global Shaper Community च्या माध्यमातून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांना सशक्त कस करता येईल याचा प्रयत्न केला गेला. बारामती तालुक्यातील शिरसुफळ या गावी Global Shaper Community Baramati Hub च्या माध्यमातून सुमारे १००० सॅनिटरी नॅपकिन पॅड वाटप करण्यात आलं. एवढंच नाही तर त्याच वापर व त्याच विघटन कस करावं या विषयी कार्यशाळा आयोजित केली. मा. देवयानी पवार (Curator Global Shaper Community Baramati Hub) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला
यासाठी उपस्थित मान्यवर मा. आप्पासाहेब आटोळे सरपंच,मा. विठ्ठल आटोळे (ग्रा. सदस्य)मा. रमेश हिवरकर (ग्रा. सदस्य) सौ.डॉ.मृदुला जगताप(आरोग्य अधिकारी प्रा. केंद्र भिगवण) श्रीमती.सरिता शिंदे (अध्यक्ष महिला बचत गट) श्रीमती. बगाडे ( प्रा. आरोग्य केंद्र शिरसुफळ) श्रीमती. प्रमिला शिंदे (ग्रा. सदस्य) श्रीमती. गाढवे (शिक्षिका शिरसुफळ) श्रीमती. गावडे (शिक्षिका शिरसुफळ) आरोग्य विभागाचे मा. पुष्पराज निंबाळकर मा.दत्तात्रय ननावरे व मा.पांडुरंग गायकवाड कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जशी टीम वर्क ची गरज असते तस Global Shaper Community च्या फातिमा कायमखनी, शंतनु जगताप, शुभम ओसवाल, माऊली खाडे, भारवी मूलमुळे,अक्षय घोलप, रवी कांबळे, अमेय पवार, खाडीज कायमखनी, ऋतुजा सोळसकर, हत्तीम आतारवाला यांनी उत्तम रित्या आपली कामगिरी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *