बारामती : (प्रतिनिधी : रियाज पठाण ) शनिवार १८/ ०६/ २०२२ रोजी भिकोबा नगर येथील श्री विठ्ठल माध्यमिक येथे सन २००५ सालाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक जण पुढील शिक्षणासाठी परगावी गेले,तर काही जण आपापल्या व्यवसायात मग्न झाले. अशातच दोनाचे चार हात झाले प्रत्येक जण आपल्या संसारांमध्ये रमून गेले संसाराचा गाडा हाकत असताना तब्बल १७ वर्षानंतर मुला-मुलींना व्हाट्सअप द्वारे एकत्रित करण्याचे काम विवेक टेंगले यांनी सुरू केले. सगळ्यांच्या अडचणींना मात करून स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन केले. हे करत असताना विद्यार्थ्यांनी शाळेला काही भेट वस्तू दिल्या आणि आपल्या मनात शाळेविषयी असणारे प्रेम आणि कृतज्ञता दाखवून दिले.तेवढ्याच आपुलकीने शाळेने देखील भेटवस्तू देऊन स्वागत केले व आदरपूर्वक सन्मान व विचारपूस करून विद्यार्थ्यांचा सन्मान केला. व खास मुलींनीही वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपस्थितांची मन जिंकली आणि श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय ची सर्व मुला- मुलींनी समाजासमोर एक आदर्श दाखवून दिला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप यांचे विशेष प्रयत्न व मार्गदर्शन देखील लाभले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार पवार व शाळेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षक देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांपैकी अनुराग खलाटे यांनी केले व मुला- मुलीशी संवाद साधला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला.
हा कार्यक्रम करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला त्यापैकी हेमंत कोकरे, विवेक टेंगले, प्रवीण टेंगले, तानाजी टेंगले, रवींद्र कोकरे, अमर कोकरे, सत्यवान साबळे, किरण मोरे, अनुराग खलाटे, अतुल बिबे व स्वप्निल वाबळे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील आठवण राहावी म्हणून शाळेमध्ये वृक्षरोपणना चा कार्यक्रम घेण्यात आला व स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.
हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मित्र मैत्रिणींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.