बारामती – (प्रतिनिधी इंद्रभान लव्हे ) करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गरजू आणि आरोग्य विभागात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांतना युथ व्हिजन तर्फे रिलायन्स फाउंडेशन उपक्रमातर्ग्त मास्क आणि हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्थरातील अनेक गरजू आणि आरोग्य विभागातील कर्मचार्यांभना पाच हजार मास्क, हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी जिवाची बाजी लावून काम करत आहे त्यांना शर्मिला पवार यांचे हस्ते मास्क वाटप करण्यात आले आहे. बारामती शहरात विविध भागात खरेदीसाठी आलेले विना मास्क फिरणार्यारना शोध घेऊन त्याचे प्रबोधन करून प्रत्येकाला मास्क देण्यात आले आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचार्यां्ना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. विघ्याधर हवेली सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल अमोल जगताप सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल यांना करोना योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले संस्थेचे पदाधिकारी निखिल पालकर, विशाल मेहता, अजिंक्य जगताप, शेखर काकडे, रोहित किकले, अतुल साबळे, अजय खोत, सागर म्हात्रे, सचिन सावंत, सुमित बेलसरे, अजित थोरात, प्रविण कवितके आदीचे मोलाचे सहकार्य केले आहे.