फ्रान्समध्ये झालेल्या सेमिनारमध्ये सेव द मेनीस्कस या विषयावर बारामतीच्या डॉ. रोहन अकोलकर यांची छाप …

प्रतिनिधी – बारामती शहरातील प्रसिध्द फिफा स्पोर्ट्स फिजीयोथेरेपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांचा ‘फिफा’ मेडिकल सेंटर ऑफ एक्सलन्स स्वित्झर्लंड व आयसोकायनॅटीक मेडिकल ग्रुप इटली आयोजित आंतरराष्ट्रीय फुटबॉल मेडीसिन विश्व परिषद द प्लेयर्स व्हॉइसस मध्ये यशस्वी सहभाग राहीला. अशा पध्दतीने सहभाग नोंदविणारे ते एकमेव फुटबॉल फिजियोथेरेपिस्ट ठरले आहेत.
या प्रसंगी “सेव द मेनीस्कस” या विषयावर बोलण्यासाठी इंटरनॅशनल फॅकलटी स्पीकर म्हणून डॉ. रोहन अकोलकर यांना आमंत्रित केले होते.
फ्रान्समधील लयॉन येथे पार पडलेल्या या विश्वपरिषदेमध्ये जगभरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिजिओथेरेपिस्ट सहभागी झाले होते. या ठिकाणी अॅडव्हान्स फुटबॉल मेडीसिनचे प्रशिक्षण देण्यात आले असून यावर्षी कतार येथे होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकप संदर्भात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्स लयॉन येथील सिटे इंटरनॅशनल स्टेडियम येथे सदर विश्वपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रोहन अकोलकर यांनी सिंगापूर येथून स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये पीएचडी पुर्ण केली आहे. यापूर्वी ते रशियात झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही फिजीओथेरपिस्ट म्हणून सहभागी झाले होते. कतार येथे होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेतही ते फिजिओथेरपीस्ट म्हणून सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *