नातेपुते :(प्रतिनिधी :रियाज पठाण.) शुक्रवार दिनांक १७ रोजी नमाज पठण झाल्यानंतर,समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सार्वजनिक शाही मस्जिद मध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी (ए पी आय) मनोज सोलनकर व महसूल विभागाचे मंडल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.इस्लाम धर्मा मध्ये प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर मुस्लिम धर्मीयांचे अनुयायी आहेत यांना उच्च आदरांचा दर्जा असून संपूर्ण विश्वामधील केवळ मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मियांसाठी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अत्यंत आदर व सन्मानपूर्वक भावना व आस्था आहे,नुपुर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे जाणीवपूर्वक रित्या इस्लाम धर्माची धारणा तसेच पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचे वक्तव्य केलेले असून याविषयी अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजासह इतर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,या क्रूर निंदनीय घटनेचे समस्त मुस्लिम समाज नातेपुते च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले,यावेळी प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देताना शाही मस्जिद चे मौलवी (आलिम) मेराज शेम्सी सहाब यांच्यासह संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *