प्रतिनिधी – श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, बारामती येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर विद्यार्थी गेली दोन वर्ष शाळेपासून दूर होते, परंतु शैक्षणिक वर्ष 2022- 2023 यावर्षी शालेय विभागाच्या आदेशानुसार 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले. यावेळी विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शाळेच्या प्रांगणामध्ये मिरवणूक काढण्यात आली.
शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन व शालेय पुस्तकांचे वाटप करून स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी माननीय मुख्याध्यापक, श्री. पवार बी. एन., पर्यवेक्षक मा. श्री. साळुंके ए. एस. शिक्षक प्रतिनिधी मा.श्री. तावरे जी. आर. तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात माननीय मुख्याध्यापक, श्री. पवार बी. एन. यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. तृप्ती कांबळे व श्रीमती.रोहिणी टेके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. जाधव एस. एम. यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *