नानासाहेब साळवे : बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे आज नवीन विद्यार्थाचे गुलाबपुष्प व नवीन पुस्तक देऊन मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार दि 15 जून पासून राज्यभरातील शाळा सुरू होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विद्यालयात इ 5 वी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थाचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच इ 5 वी ते 8 वी पर्यंतच्या मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रमास बारामती तालुक्याचे क्रीडाधिकारी श्री चौले, विद्यालयाचे नूतन प्राचार्य श्री मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री रमेश जाधव , श्री अर्जुन मलगुंडे, श्री सुनील चांदगुडे इतर सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे नूतन प्राचार्य श्री मोरे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सर्व नवीन विद्यार्थी व नूतन प्राचार्य श्री मोरे यांचे स्वागत व अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सदाशिव (बापू)सातव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *