प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अण्णा भाऊंचे सहकारी प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ग्रंथाचा वितरण सोहळा” महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे – पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
हा सोहळा महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि आर.के. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले, की अण्णा भाऊंच्या साहित्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. सोनाग्रा हे अण्णा भाऊंचे सहकारी त्यांनी भारतामधील पहिल्या हिंदी “विश्व जन साहित्यकार अण्णा भाऊ साठे” या ग्रंथांचे वितरण करण्याचे भाग्य मला लाभले. ते पुढे म्हणाले की अण्णा भाऊंची शाहिरी ही तळपती तलवार आहे. अण्णा भाऊंनी साहित्यातून लोकनाट्य हा प्रयोग महाराष्ट्राच्या साहित्यात रुजवला. स्वतंत्र, समता, न्याय अशी अण्णा भाऊंची साम्यवादी विचार धारा होती. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळाला यासाठी सरोतपरी मी प्रयत्न मी करेन. भविष्यात मी अण्णा भाऊसाठे महामंडळाला योग्य तो निधी देण्याचे असे त्यांनी आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की अण्णा भाऊंचे साहित्य वास्तवादी होते. सामान्य माणूस हाच अण्णा भाऊंचा नायक होता. अण्णा भाऊंच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने हा सोहळा आयोजीत केला होता. पुढे ते म्हणाले की मातंग समाजाला नेहमीच वळसे पाटलांनी मदत केली आहे. अण्णा भाऊंच्या महामंडळाला आपण एक हजार कोटी रुपयांची मदत देवून महामंडळाला आपण संजीवनी द्यावी अशीही वैराटांनी यावेळी मागणी केली.
प्रा. रतनलाल सोनग्रा बोलताना म्हणाले की पहिले साहित्य संमेलन झाले त्यावेळी अण्णा भाऊंनी त्यावेळी म्हंटले की “धरती ही शेषनागच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळ हातावर ती तरली आहे.” असे ते म्हणाले की अण्णा भाऊंचे साहित्य हे लोकमांगल्य आहे. त्यांच बरोबर दलित साहित्य हे सत्य साहित्य आहे. यावेळी सोनाग्रा यांच्या आत्मकथेचे पाच भाग सोन जातक, विद्या जातक लोक जातक सेवा जातक, मित्र जातक या खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महंमद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, संतोष बोताळजी, परमेश्वर लोंढे, गणेश लांडगे, वंदना पवार, वैशाली अवघडे यांनी विशेष परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले तर आर के फाउंडेशनच्या आरती सोनाग्रा यांनी आभार मानले.