बारामती : नगरपरिषद वाढीव हाद्दीमधील जळोची,रूई तांदुळवाडी परिसरात गेल्या 8 ते 9 महीन्या पासुन स्ट्रीट लाईटचे नुसतेच पोल उभा केलेले आहेत, परंतु त्यावर अद्याप पथदिवे लावले नाहीत पाठीमागच्या काही दिवसांपुर्वी नगरपरिषदेला लेखी पञ देऊन लवकरात लवकर या मागणी कडे लक्ष देऊन त्याची पूर्तता करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन देखील जानुन बुजुन या मागणी कडे दुर्लक्ष केले त्यामुळे ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे मत सातकर यांनी व्यक्त केले. या वेळी अँड.अमोल सातकर यांनी सांगीतले या वाढीव हद्दीच्या परिसरातील लोक रोज वाट बघत आहेत आज रस्त्यावरती उजेड पडेल उद्या पडेल, परंतु नगरपालिका प्रशासन जाणुन बुजुन या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत आहे, नगरपरिषद प्रशाषण सांग काम्या झाले आहे, काम सांगीतल्याशीवाय कामच करत नाही, लवकरात लवकर पथ दिवे बसले नाही तर आम्ही येणाऱ्या काळात याच उभा केलेल्या पोल वरती अगीचे टेंबे जाळू असे सांगीतले, या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे, तालुकाध्यक्ष अँड.अमोल सातकर, शुभम मोरे, विठ्ठल देवकाते, काकासाहेब बुरूगंले, महादेव कोकरे, रेवण कोकरे, नवनाथ मलगुंडे, भीवा मलगुंडे, शाम घाडगे, किशोर सातकर, अमोल भुजबळ,निखील दांगडे, भुषण सातकर, शंतनु देवकाते, आदी लोक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *