पुणे, दि. ७:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी ३१ मे वरुन मुदत वाढवून देवून ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. तरी या लाभार्थ्यांनी तात्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *