पुणे, दि. 7: रासायनिक खतांच्या अंतिम खत विक्री दरामध्ये 1 एप्रिल 2022 पासून सुधारणा करण्यात आलेली असून निश्चित दरापेक्षा अधिक दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळवले आहे.

युरिया खताची किंमत प्रतिबॅग 266.50 रुपये निश्चित असून डिएपी खताची प्रतिबॅग किंमत इफको, जीएसएफसी, आरसीएफ, कृभको, आयपीएल, झुआरी पीपीएल/एमसीएफएल, कारोमंडल, स्पीक, चंबळ या नाममुद्रेची 1 हजार 350 रुपये तर एनएफएल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 200 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

एमओपी खताची किंमत जीएसफसी, आरसीएफ, आयपीएल, चंबळ या कंपनीच्या प्रतिबॅगची विक्री किंमत 1 हजार 700, एनएफएल 1 हजार 100 तर कोरोमंडलची 1 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या 24:24:00 खताची किंमत 1 हजार 900 रुपये, कोरोमंडलच्या 24:24:0:85 खताची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

20:20:0:13 या खताची इफको कंपनीच्या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 400, दीपक फर्टिलायझर्स, कोरोमंडल- 1 हजार 450 रुपये, जीएसएफसी- 1 हजार 325 रुपये, आरसीएफ 1 हजार 150 रुपये, कृभको- 1 हजार 300 रुपये, आयपीएल- 1 हजार 320, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, चंबळ, एनएफएल- 1 हजार 470 रुपये, स्पीक-1 हजार 475 रुपये यापेक्षा अधिक दराने एका बॅगेची विक्री करता येणार नाही.

झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या 19:19:19 या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 575 रुपये, 10:26:26 या खताची इफको, दिपक फर्टिलायझर्स, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल कंपनीच्या खतांची किंमत प्रतिबॅग 1 हजार 470 रुपये तर जीएसएफसी- 1 हजार 440 रुपये प्रतिबॅग, 12:32:16 या रासायनिक खताची जीएसएफसी कंपनीच्या खताची 1 हजार 450 रुपये तर इफको, दीपक, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल- 1 हजार 470 रुपये, 14:35:14 या कोरोमंडल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

14:28:00 या दीपक फर्टिलायझर्सच्या खताची किंमत 1495 रुपये, 15:15:15 या आरसीएफच्या खताची किंमत 1 हजार 500 रुपये, 16:20:00:13 या खताची जीएसएफसी कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 125, आयपीएल-1 हजार 250 रुपये, आणि कोरोमंडल 1 हजार 400 रुपये, आयपीएल कंपनीच्या 16:16:16 खताची किंमत 1 हजार 475 रुपये, 28:28:00 या खताची झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 700, कोरोमंडल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

जीएसएफसी कंपनीच्या अमोनिअम सल्फेट खताची किंमत 1 हजार 100 रुपये, 15:15:15:09 या खताची आयपीएल कंपनीची बॅग- 1 हजार 450, कोरोमंडल- 1 हजार 375 रुपये, कोरोमंडलच्या 17:17:17 खताची किंमत 1 हजार 210 रुपये, दीपक फर्टिलायझर्सच्या 08:21:21 या 40 कि. ग्रॅ. च्या बॅगची किंमत 1 हजार 850 रुपये तर 09:24:24 या खताच्या 40 कि. ग्रॅ.च्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

कोणी विक्रेता जादा दराने खत विक्री करताना आढळल्यास जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 020-25537718,25538310 भ्रमणध्वनी क्र. 9158479306, 9423874067, इमेल आयडी dsaopune@gmail.com, adozppune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बोटे (भ्र. क्र. 9422384384) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *