माळेगाव, प्रतिनिधी (गणेश तावरे) – 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त SPNF अर्थात पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाने व SPNF तंत्रज्ञानाने, बारामती नॅचरल SPNF शेतकरी ग्रृप च्या शेतकरी मित्रांनी श्रीमती प्रेमलताबेन शांतीलाल मेहता पांजरपोळ गोशाळा, जळगाव क. प. बारामती यांचे संस्थापक श्री सुनीलभाई मेहता यांच्या व SPNF चळवळीतील पुणे येथील कार्यकर्त्या ज्योतिताई शहा यांच्या सहकार्याने तसेच बारामती नॅचरल्स च्या श्री मिलिंद सावंत यांच्या पुढाकाराने नैसर्गिक spnf शेतीमधील जीवामृत, घनजीवामृत, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र, दशपर्णीअर्क इत्यादी निविष्ठा बनवण्यासाठी गरजेचे असणारे देशी / गावरान गाईचे गोमूत्र व शेण उपलब्ध व्हावे ,नैसर्गिक SPNF शेतीला प्रेरणा, चालना व प्रोत्साहन मिळून
सर्वाना विषमुक्त नैसर्गिक भाजीपाला, फळे धान्य, कडधान्य मिळावे यासाठी देशी गाईंचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान बारामती नॅचरल्स SPNF शेतकरी ग्रृप चे सर्व शेतकरीबंधू आणि सुनीलभाई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या वेळी सर्वाना नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांनी देशभर हा असाच सुंदर आदर्श उपक्रम कसा राबवता येईल व भाकड देशी गाईंना जीवदान कसं देता येईल या विषयी फोनवरून सर्वांना मार्गदर्शन केले,
बारामती नॅचरल ग्रृप च्या वतीने गोरख सावंत यांनी देशी गाईचे चांगल्या प्रकारे संगोपन केले जाईल याची खात्री दिली. गोशाळेचे व SPNF चळवळीतील सर्वांचेच आभार मानले.