बारामती: राष्ट्रीय जैविक ताण संस्थान माळेगाव बारामती यांच्यामार्फत विद्यार्थी व तरुण संशोधक व्यवसायिक यासाठी कृषीमधील अजैविक तणाव कमी करण्यासाठी कौशल्य विकास प्रात्यक्षिक प्रशिक्षण १ जून ते १० जुलै २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. याचा नुकताच उद्घाटन समारंभ दिनांक २ जून २०२२ रोजी संस्थेचे निर्देशक डॉ. हिमांशू पाठक यांच्या हस्ते संस्थेच्या सरदार वल्लभाई पटेल सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. जगदीश राणे तसेच इतर विभाग प्रमुख, संस्थेचे शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ.अण्णासाहेब शिंदे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी व संस्थेच्या तरुण संशोधक व्यावसायिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. याप्रशिक्षणाचे आयोजन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशिक्षण संचालक डॉ.गोरक्ष वाकचौरे, प्रशिक्षण सहसंचालक डॉ.आलिझा प्रधान, डॉ.प्रतापसिंह खापटे, डॉ.एस.गुरूमृर्थी तसेच प्रशिक्षण प्रशांत भोसले व कु.जया चौधरी यांनी केले.
उद्घाटन पर भाषणात डॉ. हिमांशू पाठक म्हणाले जल वायू परिवर्तन कृषीमध्ये वाढणारे अजैविक ताण व त्यांचे व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. राष्ट्रीय आणि जागतिक अन्न उत्पादन आणि मूल्य साखळीवर याचा गंभीर परिणाम होत आहे
यासाठी संशोधन उपक्रमासोबत संस्था विस्तार उपक्रमाचे आयोजन करत आहे.अजैविक ताणांचे गंभीर परिणाम ओळखणे व त्यावरील योग्य उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी व तरुण संशोधक व्यवसायिक यांनी पुढाकार घेऊन कौशल्य विकास वाढवले पाहिजे. प्रशिक्षण सोहळ्याच्या प्रास्ताविक भाषणात विभाग प्रमुख डॉ.जगदीश राणे यांनी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील अजैविक ताण आणि हवामानातील बदलांच्या व्यवस्थापनासाठी कौशल्य विकास व होणारे फायदे सांगितले. तसेच प्रशिक्षण संचालक डॉ.गोरक्षक वाघचौरे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली.
यावेळी संस्थेच्या सर्व विभाग प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आलिझा प्रधान यांनी केले तर आभार डॉक्टर प्रतापसिंह खापटे यांनी मानले.या सोहळ्याची सांगता राष्ट्र गीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *