फलटण, प्रतिनिधी – आदिवासी पारधी समाज्यातील महिलेस लोणंद पोलीस स्टेशन व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी अमानुषपणे मारहाण करून तमाशामंडळामध्ये मिळालेले 90 हजार रूपये घेऊन गेले, तुझा मुलगा कुठं आहे खर सांग असे विचारात फलटण, लोणंद पोलीस कर्मचारी व अधिकारी याच्याकडून आदिवासी पारधी समाज्यातील महिलेस जखम होईपर्यंत मारून घराची झडती घेत कपाटातील मालतीताई इनामदार लोकनाटय तमाशा मंडळ येथे मुलगा व सुनेला भेटलेले मानधनातील पैसे 90 हजार कपाटातून घेऊन गेले. मारहाण केलेल्या महिलेवर बारामती महिला हॉस्पीटल बारामती मध्ये वैदयकिय उपचार केले आहेत. महिलेस मारहाण करणाऱ्या फलटण, लोणंदच्या 15 पोलीस अधिकारी व कर्मचारी याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने केली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण व फलटणचे प्रांतधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे तक्रारी अर्ज देण्यात आलेला आहे.घाडगेमळा ( बडेखान ) काळज ता.फलटण जि.सातारा या ठिकाणी सौ.परविन मदन काळे व तिचे पती मदन भगवान काळे यांच्या मुलबाळासह राहण्यास असून मालतीताई इनामदार लोकनाटय तमाशा मंडळ नारायणगांव ता .जुन्नर जि.पुणे या तमाशामंडळामध्ये कलावंत म्हणून सौ.परविन मदन काळे यांचे मुले व सुना काम करून उदरनिर्वाह करीत आहेत दि . २१/०५/२०२२ रोजी सकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान फलटण तालुका पोलीस स्टेशन व लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पिडीत महिलेच्या घरावर छापा टाकला असता. पिडीत महिलेने पोलीस अधिकारी व कर्मचा – यांना विचारणा केली. तुम्ही कशाबद्दल आमच्या घरी सकाळी आला फलटण तालुका पोलीस स्टेशन व लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सौ . परविन काळे या महिलेस हातातील काठीने हातावर खांदयावर व पोटावर जबरदस्त मारहाण केली. त्यांना मारहान झाल्याने त्या जमिनीवर कोसळल्या त्यावेळी तमाश्यामधील कलावंताच्या कामाचे मिळालेले एकूण ९०,००० / – रूपये कपाटातून घेवून गेले . फलटण तालुका पोलीस स्टेशन व लोणंद पोलीस स्टेशन ता . पारगांव खंडाळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर , पी .एस . आय गणेश माने , श्री. राजू कदम ( हवालदार ) श्री . महेश जगदाळे व इतर १५ (नावे माहिती नाही) कर्मचारी यांनी आदिवासी पारधी समाज्यातील महिलेस अमानुषपणे मारहाण केली . त्यासंदर्भात ” बारामती महिला हॉस्पीटल बारामती मध्ये वैदयकिय उपचार केला . केस पेपर नं . ४ ९९ २ एम.एल.सी नं . १६३१ असा आहे . महाराष्ट्राला शाहु , फुले , आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे . अशा सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणा – या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आदिवासी पारधी समाज्यातील महिलेच्या अंगावर हात टाकणे हे निंदनिय आहे . सातारा जिल्हा शुरविरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . सातारा जिल्हयाने अनेक शुरवीर योध्दे आपल्या महाराष्ट्राला दिले . अशा जिल्हयात पारधी समाज्यातील महिलेवर अमानुषपणे पोलीस अधिकारी व कर्मचारी हात उचतात . अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे . सातारा जिल्हयामध्ये अनेक पारधी कुटूंबे वास्तव्यास आहेत . प्रत्येक कुटूंब आपआपल्या परीने उपजिविका करीत आहे . महाराष्ट्र शासन अनेक शासकीय योजना अमलात आणत आहे . परंतू आदिवासी पारधी समाज्याला मुख्यप्रवाहात आणण्याऐवजी जाणून बुजून त्यांना गुन्हेगार म्हणून जगावे असे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाटते . त्यामुळे अशा घटना सतत घडत असतात . त्यामुळे फलटण तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी व लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी ए.पी.आय श्री . विशाल वायकर , पी . एस . आय श्री . गणेश माने , राजू कदम – हवालदार , श्री . महेश जगदाळे – फलटण तालुका पोलीस स्टेशन व इतर १५ ( नावे माहित नाही ) यांनी दु – व्हिलर वर जावून सदर महिलेस मारहान केलेली आहे . त्यावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंध कायदयाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी आदिवासी पारधी परिवर्तन परिषद व सौ . परविन मदन काळे यांचे कुटूंबीय समवेत मा . उपविभागीय अधिकारी सो फलटण यांच्या कार्यालयासमोर दि. ३१/०५/२०२२ रोजी सकाळी १०:३० वा पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत.