स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – पाच दिवसात घरफोडीचा गुन्ह्या उघड करून आरोपी केला जेरबंद ..

प्रतिनिधी – बारामती तालुका पोलिस स्टेशन इथे मोबाइल चोरीस गेलेल्या तक्रारी वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी व तपास सुरू केला असता सदरच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा ईसमनामे संतोष ज्ञानेश्वर करडे वय 25 रा.श्रीहरीनगर माळीनगर अकलूज ता. माळशिरस जि सोलापूर याने चोरल्याची माहिती मिळालेने सदर गुन्ह्याचे तपासकामी त्यास ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा मित्र सुनिल महादेव भोरे रा. बिजवडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर असे आम्ही दोघांनी मिळून केला असल्याचे सांगितले. आरोपी संतोष ज्ञानेश्वर करडे वय 25 रा.श्रीहरीनगर माळीनगर अकलूज ता. माळशिरस जि सोलापूर यास मुद्देमालासह वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण मा अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग मा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोसई अमित पाटील, Asi राजपुरे, हेड कॉन्स्टेबल रविराज कोकरे, हेड कॉन्स्टेबल अतुल डेरे, हेड कॉन्स्टेबल राजु मोमीन, पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे पोलीस नाईक स्वप्नील अहीवळे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *