पिंपळी: राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन पिंपळी लिमटेक येथील युवक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी व्याख्याते अनिल रुपनवर यांनी माहिती देतांना एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात झाला. अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी,कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र व कार्य व्याख्यानातून त्यांनी सादर केले.
तसेच मनोगत नितीन देवकाते यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संतोषराव ढवाण पाटील, मंगल हरिभाऊ केसकर, आबासाहेब देवकाते पाटील, मोहनराव बनकर पाटील,अशोकराव देवकाते पाटील, रमेशराव देवकाते पाटील, आबासाहेब मेरगळ, देवेंद्र बनकर, सोना देवकाते पाटील,दादासाहेब केसकर, धूळासो ठेंगल, सुनिल बनसोडे,नितीन देवकाते, अजित थोरात, वैभव पवार, पप्पू टेंबरे,बलभीम यादव,आनंदराव देवकाते, लालासाहेब चांडे, शरद केसकर,बापूराव केसकर, नवनाथ देवकाते, संदिप केसकर, अण्णासाहेब आगवणे, आबासाहेब केसकर, रणजित देवकाते,सूरज बनकर, दिपक देवकाते,अमोल केसकर,नानासो मोटे,रमेश दिनकर देवकाते पाटील विशाल ठेंगल, अभिजित देवकाते ,हनुमंत देवकाते, योगेश बाबर,आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन बाळासो बनसोडे यांनी केले व प्रस्ताविक आबासाहेब केसकर यांनी केले तर आभार दिपक देवकाते यांनी मानले.