प्रतिनिधी – शिंदेवस्ती,राजुरी ता.करमाळा जि.सोलापूर येथे तुळजा भवानी, पद्मावती देवी, यमाई देवी औंध,आप्पाजी बुवा मंदिराचा मुर्ती पूजन व कलशारोहण कार्यक्रम व सभामंडपाचे उद्घाटन करमाळा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला, तसेच महाआरती करण्यात आली. तसेच कर्जत नगर पंचायत चे प्रथम नगराध्यक्ष मा.श्री.नामदेव (देवा) राऊत, मा.जिल्हा परीषद उपाध्यक्ष सोलापूर मा.सुभाष (आबा ) गुळवे, मा.जिल्हा परीषद सदस्य मा.उध्दव (दादा) माळी,राजुरी चे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तसेच यावेळी आर.आर साखरे, रमण काका सोळंकी, दत्तू बोबडे, गणेश जाधव (बँक ऑफ इंडिया) तसेच राजुरी गावातील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार संजय मामा शिंदे, नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत,आदींची भाषणे झाली. यावेळी आमदार संजय मामा शिंदे बोलताना म्हणाले राजुरी गावातील सर्व कामे केली जातील तशे प्रयत्न चालू आहेत, ग्रामपंचायत कार्यालय इमारती साठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे लवकरच निधी वर्ग करून कामास सुरुवात होईल. तसेच नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत बोलताना म्हणाले आमदार संजय मामा शिंदे सर्व कामे करतील आणि सर्व राजुरीकर देखील आमदार मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन प्रल्हाद आण्णा शिंदे (मा. ग्राम. सदस्य. राजुरी), लालासाहेब भोयटे (प्रगतशील बागायतदार), पै. आजिनाथ शिंदे,लखन शिंदे, आजिनाथ सर्जेराव दुरंदे, आप्पासाहेब हनुमंत देशमुख, किरण मधुकर देशमुख, पांडुरंग बोराटे, पद्मावती तरुण मंडळ शिंदेवस्ती यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमासाठी रामदास शिंदे, जालिंदर शिंदे, मनोहर शिंदे, मच्छिंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सूरज शिंदे, अनिकेत शिंदे, पै.शुभम शिंदे, आभिजित बोराटे.आदि युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *