प्रतिनिधी – गणेश तावरे – 1 ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून व महाराष्ट्रात कोरोणाचे संकट असल्यामुळे गर्दी टाळून यंदा जयंती साधेपणाने करण्याचा निर्णय अंजनगाव येथे घेतला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने कोकण, चिपळून येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून बारामतीचे प्रसिद्ध फोटोग्राफर श्री प्रशांत कुचेकर आणि बंधू दादासाहेब कुचेकर यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून 50 किलो तांदूळ देण्यात आले. लागीर या वेब सिरीयल चे बारामतीचे युवा दिग्दर्शक आकाश डेंगळे व बारामतीचे विनोदी कलाकार बाळासाहेब बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. समस्त बारामतीकरांनी शक्य होईल तेवढी योग्य ती मदत आपण सर्वांनी करावी व कोकण पूरग्रस्तांना मदत करावी अशी भावना कुचेकर बंधू यांनी व्यक्त केली आहे. अंजनगाव येथे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप, गोरगरीब विद्यार्थ्यांना कपडे इत्यादी वस्तू वाटप असे स्तुत्य उपक्रम कुचेकर बंधूंनी यापूर्वी देखील केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *