बारामती दि.२५: राष्ट्रीय मागासवर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना,जुनी पेन्शन योजना सुरु करावी,ईव्हीएमचा वापर मतदानासाठी होऊ नये,खाजगी क्षेत्रात एससी,एसटी,ओबीसींना आरक्षण लागू करावे,कामगार कायदा रद्द करावा व सीएए,एनआरसी सारखे अन्यायकारक कायदे मागे घेण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी बुधवार दि.25 मे रोजी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या सहभागाने भारत बंद पुकारला होता.त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत देखील भारत मुक्ती मोर्चा चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे यांनी केलेल्या बंदच्या अहवानाला प्रतिसाद देत.बारामतीकरांनी देखील या बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.आज सकाळपासून शहरातील मुख्य बाजारपेठ,भाजी मंडई,महावीर पथ,सिनेमा रोड सह अन्य परिसरातील दुकाने देखील कडकडीत बंद असल्यामुळे एरवी सकाळीच गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहिला मिळत होता.

दरम्यान या बंद ला रोहित बनकर,नितीन थोरात,असिफ बागवान,ॲड.करीम बागवान,अभिजित काळे,शुभम अहिवळे,कल्याणी वाघमोडे,सुधाकर माने,मुनीर तांबोळी,साधू बल्लाळ,अमित आगम,संतोष नेवसे,प्रकाश टेमघर,राजू मदारी,अमोल कुलट,प्रा.डी.व्ही सरोदे,बबलू शेलार,पूजा लोंढे,अनिता शेलार,संगीता कांबळे, ज्योती गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.भारत मुक्ती मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष उषा थोरात यांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उपस्थितींना संबोधित केले.

दरम्यान,हा बंद यशस्वी करण्यासाठी गौतम शिंदे,नितीन गव्हाळे,विकास जगताप,विशाल घोडके,शेखर अहिवळे,रणधीर चव्हाण,विजय मागाडे,प्रशांत लांडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *