पुणे दि.25 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन) येरवडा येथे 2022-23 या शैक्षणिक वर्षात कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार राहील. सदर शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरूण पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात, असे वसतिगृह अधिक्षक यांनी कळविले आहे.