बारामती:- बारामती मधील वसंतनगर येथे रेल्वे लाईन लगत दत्तमंदिर व समाजमंदिर मागे असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था गेल्या अनेक महिन्यापासून झाली असून येथील नागरिक वेळोवेळी पाठपुरावा करतात मात्र दुर्लक्ष होतंय लवकरच येथील नागरिक आंदोलन करण्याचा भूमिकेत आहेत. आपण लक्ष घालावे असे बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी माहिती दिली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरातील शौचालयाची अवस्था वाईट झाल्याने व या मध्ये भांडे तुटून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याने याबाबत वारंवार कल्पना देऊनही अद्याप पर्यंत दखल न घेतल्यास लवकरच जन आंदोलन करणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *