नातेपुते (प्रतिनिधी)- आंबेडकरी विचारधारा सांगणारे विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने बुद्ध जयंतीचे औचित्य साधून लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र 2022 चा लोककवी वामनदादा कर्डक विद्रोही शाहीर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त अकलूज सारनाथ बुद्धविहार येथे बुद्ध महोत्सव विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमादरम्यान पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे प्रमुख प्रमोद शिंदे,ऍड सुमित सावंत तसेच सारनाथ बुद्धविहार येथील बौद्ध बांधवांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विद्रोही आंबेडकरी जलसा च्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले.
शाहीर संभाजी भगत यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Byसंपादक-योगेश नामदेव नालंदे
May 18, 2022