बारामती: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तीक जयंतीनिमित्त अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रेणुकानगर, फलटण रोड, कसबा याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे यंदाचे 7 वे वर्ष आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, कॉंग्रेसचे मा.शहराध्यक्ष ऍड.रविंद्र रणसिंग, जोजारे सराफचे गणेशशेठ जोजारे, सरकारी वकील ऍड.अमोल सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विशाल जाधव, युवा नेतृत्व विपुल ढवाण, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मंगलदास निकाळजे, नगरसेवक सुरज सातव, फलटणचे युवा नेतृत्व आरिफ पटेल, सिद्धनाथ भोकरे, कॉंग्रेसचे रोहित बनकर, संदेश गालिंदे, निलेश पलंगे, पिंटू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, ऍड.निलेश वाबळे, पत्रकार तैनुर शेख, योगेश नालंदे, मन्सूर शेख, गौरव अहिवळे, रियाज पठाण, कृष्णा क्षीरसागर, शुभम गायकवाड, आरटीआय कार्यकर्ते पोपट धवडे, गणेश आटपाटकर इ. मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी ऍड.अमोल सोनवणे, तैनुर शेख, गणेश जोजारे, विशाल जाधव इ. शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत जिवनज्योत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश महाडीक, उपाध्यक्ष मोहिन शेख, खजिनदार चैतन्य गालिंदे, प्रतिक जोजारे, शुभम पडकर, शाहरूख पठाण, इमाम शेख यांनी केले. शेवटी आभार गौरव अहिवळे यांनी मानले.