तथागत गौतम बुद्धांना बारामतीत अभिवादन..

बारामती : विश्वाला शांतीचा संदेश देऊन मानव हिताचे कार्य करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बुद्ध पूजापाठ घेऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी बसपा नेते काळुराम चौधरी,बामसेफचे जिल्हाध्यक्ष आनंद थोरात, वि.श्री.कांबळे यांनी शुभेच्छापर मनोगतातून गौतम बुद्धांच्या कार्यसह बौद्धकालीन इतिहासावर प्रकाश टाकला.

दरम्यान या कार्यक्रमाला बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,माजी नगरसेवक गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ,माजी नगरसेविका मयुरी सुरज शिंदे,आरती शंकर गव्हाळे,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,किशोर सोनवणे,प्रा.डि.व्ही.सरोदे,दिनेश जगताप,विजय खरात,साधू बल्लाळ,सिद्धांत सावंत,अजित कांबळे,उत्तम धोत्रे आदी उपस्थित होते.

कर्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,परीक्षित चव्हाण,विश्वास लोंढे,सचिन जगताप,संतोष जगताप,विकास जगताप यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम अहिवळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *