प्रतिनिधी – उत्तराखंड केदारनाथ ते लोधवडे माण या 2300 किलोमीटर च्या भारतातील सर्वात लांब पल्याच्या शंभु ज्योतीचे बारामती येथे क्रीडा संकुल बारामती येथे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,बारामतीचे प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव बापू सातव, ऍड.बर्गे, तालुका क्रीडा अधिकारी डिचले, शंभू ज्योतीचे आयोजक वैभव बाबा मोरे, माण तालुका रहिवाशी संघांचे शशिकांत नाना देशमुख, अशोक देवकर, शामराव राऊत, उमेश पांढरे, शहाजी खाडे, आप्पासाहेब भांडवले, सुशील शिंदे, शिवाजी बोराटे यांच्यासह माण तालुका रहिवाशी संघांचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.