बारामती: पिंपळी-लिमटेक गावातील होतकरू व सुशिक्षित बेरोजगार महिला व युवतींसाठी दहा टक्के महिला राखीव निधीतून मोफत २१ दिवशीय टेलरिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ९ मे २०२२ ते २९ मे २०२२ पर्यंत गावातील महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी दिली.
सदर शिबिराचा शुभारंभ सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे पुंजन करून आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमेस सरपंच मंगल केसकर व उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करून करण्यात आला.
प्रस्ताविकात बोलताना या प्रशिक्षण शिबिराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित महिला व युवतींना पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शिलाई मशीन मिळणे कामी प्रयत्न करणार तसेच हायटेक टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे माध्यमातून नोकरी किंवा घरगुती व्यवसाय मिळण्याकामी प्रयत्न करू तसेच सर्व बचतगट आणि गावातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान संचालक संतोषराव पाटील यांनी केले.
त्याचप्रमाणे सावित्री महिला प्रशिक्षण संस्था पिंपळीच्या अध्यक्षा स्नेहा थोरात यांनी सदर प्रशिक्षण शिबिराचे २१ दिवसांकरिता तीन बॅचेस केल्या असून ३ महिने कालावधीचा हा कोर्स असून आपण २१ दिवसांमध्येच सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना ३ महिन्यात प्रशिक्षित होणाऱ्या प्रशिक्षणार्थीं इतकेच परिपूर्ण असे प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट देणार आहोत.तरी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करावा व स्वावलंबी व्हावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे यांनी सहकार्य केले.
स्वागत व सूत्रसंचालन अविनाश थोरात यांनी केले तर आभारात सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम हा स्तुत्य असा असून सर्व प्रशिक्षणार्थींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे संबोधित करून उपस्थित सर्वांचे आभार उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी मानले.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थींचे सरपंच व सदस्या यांचे हस्ते पुष्प भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील, बारामती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, सदस्य अजित थोरात, सदस्या स्वाती ढवाण, अश्विनी बनसोडे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या सचिव ज्योत्स्ना गायकवाड,उपाध्यक्ष पूनम थोरात, संस्थेच्या पदाधिकारी तसेच ग्रामस्थ हरिभाऊ केसकर,अविनाश थोरात,प्रा.केशव आगवणे सर, बापूराव केसकर,अनिल बनकर,दिपक गायकवाड,बापू बनकर, सुरेखा देवकाते, बेगम इनामदार,प्रसन्ना थोरात,सानिया इनामदार,दिपाली राजगुरू,शकुंतला थोरात,पूजा थोरात,अलका तांदळे,लता गायकवाड आदींसह बचत गटातील महिला,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.