प्रतिनिधी – थॅलेसिमिया हा एक असा आजार आहे, जो लहान मुलांना जन्मताच झालेला असतो. त्याची लक्षणे तीन महिन्यात दिसून येतात. रक्त उपलब्ध झाले नाही तर लहान मुलांचे जीवन धोक्यात येते. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने वसंत नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सुनेत्रा पवार (अध्यक्षा- टेक्स्टाईल पार्क बारामती), ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, श्री इमतियाज शीकीलकर (अध्यक्ष बारामती शहर रा. काँ), महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, मा नगरसेवक सविता जाधव, अर्चना जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री संजय जाधव, अविनाश गायकवाड, सयाजी गायकवाड व तेनूर शेख तसेच वसंतनगर मधील नागरिक युवक व महिला प्रचंड संख्येने हजर होत्या.
सदर प्रसंगी महिलांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. रक्तदात्यांची सुनेत्रा वहिनीनी आपुलकीने विचारपूस केली. या शिबिरामध्ये उद्दिष्ट पेक्षा जास्त रक्त बाटल्यांचे संकलन झाले. महेश गायकवाड यांच्यावर विश्वास असणाऱ्या युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.