माळेगाव (प्रतिनिधि गणेश तावरे) बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल च्या सरचिटणीस
पदी मेडद येथील लक्ष्मण मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती चे पत्र तालुका अध्यक्ष बाळासाहेब परकाळे यांनी दिले. मोरे यांनी या पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उपसभापती पदी कार्य
केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विचार सहकार क्षेत्रामध्ये पोहचवून, सहकार चळवळ ही अधिक लोकाभिमूख पारदर्शी करून सहकार सेलच्या माध्यमातून सहकाराचा व काँग्रेस पक्ष्याची ध्येय धोरणे व शासनाच्या योजना तळागाळात पोहचविन्यासाठी कार्य करु असे मोरे यांनी निवडीनंतर सांगितले.