जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील कृषि विभागामार्फत खरीप हंगामाची पुर्वतयारी उपविभागीय कृषि अधीकारी श्री.वैभव तांबे, तालुका कृषि अधीकारी श्रीमती सुप्रीया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, नॅडेप खत युनीट, गांडूळ खत युनिट, हुमणी नियंत्रण साठी प्रकाश सापळे, बिजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी, पिक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी मासीक वर्गणीदार, याचबरोबर महाडिबीटी अंतर्गत ठिबक तुषार, यांत्रीकीकरण घटकासाठी जास्तीत जास्त शेतकरी यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. 100 टन उस उत्पादन अभियान हे नव्याने राबवण्यात येणार आहे . यामधे हिरवळीचे खत ,उस पाचट कूजवणे, खोडवा व्यवस्थापण याचा समावेश आहे. याचबरोबर पिकस्पर्धा व जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी गावामधे शिवार फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी वरील सर्व उपक्रमामधे उंडवडी सुपे, उंडवडी कप, जराडवाडी गावच्या शेतकरी यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी अरविंद यमगर , कृ.प काझडे व उंडवडी गावच्या कृषि सहाय्यक माधुरी पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *