प्रतिनिधी : दिपक वाबळे – मोरगाव येथील जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा , ढोलेमळा , मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणार.
जलवाहिनीसाठी सीएसआर फंडातून 1.32 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे.
या पाईपलाईन चा भूमिपूजन समारंभ सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन मा. पुरुषोत्तम दादा जगताप यांच्या शुभहस्ते, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे महानगरपालिकाचे उपायुक्त व मोरगावचे सुपुत्र मा. संदिपजी कदम , मोरगावचे सरपंच मा. निलेशजी केदारी , माजी सरपंच मा. पोपट तावरे , उपसरपंच मा. संदिप नेवसे , मा. इंगळे , मा. कांबळे , जुगाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. अनिल ढोले , मोरया सोसायटी चे मा. चेअरमन मा. संजय आबा तावरे , बारामती तालुका राष्ट्रवादी पदवीधर चे अध्यक्ष मा. शुभम तावरे , बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष मा. अक्षय तावरे , चांगदेव ढोले , हनुमंत ढोले , अंकुश ढोले , विठ्ठल ढोले , त्रिंबक खोपडे , सखाराम तावरे , राजेंद्र तावरे , नारायण तावरे , विलास तावरे , महादेव ढोले , अभिजीत ढोले आणि समस्त मोरगाव ग्रामस्थ , शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सैनिक मा. अविनाशजी ढोले यांनी केले. या योजनेमुळे मोरगाव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सदर योजनेकामी महापालिका उपायुक्त संदीप कदम यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले. या योजनेचे काम आजपासून सुरू होणार आहे. दीड ते दोन महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.