युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 50 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी, (पल्लवी चांदगुडे )- डोर्लेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गरीब गरजू 50 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम रोहिणीताई खरसे-आटोळे यांनी आयोजित केला होता.
विद्या प्रतिष्ठान चे खजिनदार मा युगेंद्र दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय 50 विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, वॉटर बॉटल अशा प्रकारचे शालेय साहित्य वाटप आज डोर्लेवाडी येथे युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या पत्रकार, डॉक्टर, शिक्षक, आशा वर्कर, नर्स, अंगणवाडी सेविका यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी युगेंद्र दादा पवार, सरपंच पांडुरंग सलवदे, मा सभापती पंचायत समिती प्रतिभाताई नेवसे, अशोकराव नवले सभापती, कांतीलाल नाळे, बापुराव गवळी, भगवानराव शिरसागर, अविनाश काळकुटे, जावेद शेख, अजित वामन, नवनाथ मदने, सचिन निलाखे, शंभू भोपळे, रामभाऊ कालगावकर, कांतीलाल काळकुटे, यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा विधायक उपक्रमांमध्ये रोहिणीताई खरसे-आटोळे यांचा हिरीहिरीने सहभाग असतो. दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करून आपण समाज जागृती करण्याचे काम करत आहात असे मत व्यक्त करत शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावेळी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *