माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) – पणदरे पंचक्रोशीतील प्रगतशील बागायतदार श्री बाळासाहेब आनंदराव जगताप यांची कन्या कु पूजा बाळासाहेब जगताप हिने एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून PWD क्षेत्रात क्लास टू अधिकारी म्हणून यश मिळविले त्याबद्दल यांचा जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी पूजा जगताप यांनी स्कूल चे कौतुक करून संस्थेचे अध्यक्ष विनोद सर नेहमी आमच्या सारख्या मुले व मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळविल्या बद्दल सत्कार करतात व प्रोत्साहन देतात असे गौरवोद्गार केला. व मुलांना शालेय जीवनात ध्येय ठेवून कष्ट करून भविष्यात तुम्ही सुध्दा जिजाऊ ज्ञान मंदिर चे नाव मोठे करण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद जगताप, प्रिंसिपल स्वरांजली विनोद जगताप, तसेच पुजाचे वडील बाळासाहेब नाना आनंदराव जगताप, चुलते शेखर काका आनंदराव जगताप , स्कूल बस मामा नंदूकाका जगताप सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *