दिवसा-ढवळ्या घरफोडी करणाऱ्या चोरास अटक : 4,96,000 रुपयांचे सोनं रिकव्हर

बारामती तालुका पोलिसांची यशस्वी कामगिरी

बारामती – दिनांक 14 एप्रिल रोजी जराडवाडी ता. बारामती येथून दिवसा ढवळ्या घरफोडी चोरी करून साडेनऊ तोळे सोने (एकूण 4, 96,000 रुपये किमतीचे) चोरी बाबत तक्रार करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत चोरी वाढत असल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी मोहीमच हाती घेतली होती, तपास पथक यांना सदर गुन्ह्याचा तपास करून लवकर गुन्ह्याचा छडा लावण्या बाबत सूचना व मार्गदर्शन त्यांनी केले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे , तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत व पोलीस नाईक अमोल नरूटे , रणजीत मुळीक यांनी चोरट्यांना शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू केले होते. दिनांक 22/ 4/2022 रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व नांदगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथून चोरी करणारे 1. सोमनाथ उर्फ सोन्या तात्या काळे वय 22 वर्ष. रा. नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, 2. विधि संघर्शीत बालक राहणार रावि खुर्द ता. आष्टी जिल्हा बीड यांचा समावेश होता. यातील सोमनाथ उर्फ सोन्या काळे याला नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून चोरून नेलेल्या सोन्याची रिकव्हर देखील करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, बारामती विभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, बारामती विभाग पोलीस निरीक्षक महेश ढवाण, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे, पोलीस हवा. राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, चालक पोलीस नाईक सदाशिव बंडगर या सर्वांनी मिळून केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *