प्रतिनिधी : दिपक वाबळे , देऊळगाव रसाळ – बारामती तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती नंदाताई विलासराव खैरे यांचे चिरंजीव कै. राहुल विलासराव खैरे यांचे रविवार दिनांक 10/04/2022 रोजी अपघात झाला. बारामती व नंतर पुणे येथे उपचारादरम्यान त्यांचे बुधवार दिनांक 13/04/2022 रोजी निधन झाले.काल माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचा दौरा दौंड,बारामती येथील काही गावात असताना त्यांना ही बातमी कळताच सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांनी सुपे खैरेपडळ येथील नंदाताई खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच त्याच्या कुटुंबाविषयी चौकशी करत असताना त्याच्या पत्नी व मुलाची जवळ बोलावून संत्वन केले तसेच नंदाताई खैरे यांना आधार देत त्यांचे धाकटे चिरंजीव राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते श्री अतुल खैरे यांना आपल्या कुटुंबाला सावरण्यास सांगितले व इतर कुटुंब नातेवाईकांची चौकशी करून या घटनेतून सावरण्यास सांगून राहुलच्या कुटुंबास आधार देण्यास सांगितले पवार व खैरे तसेच नंदाताई यांच्या माहेरच्या रसाळ यांचा कौटुंबिक जिव्हाळा असल्याने ताईंनी ही गोष्ट आपल्या आई यांच्या कानावर घालते व आई इकडे आल्यानंतर तुम्हाला कल्पना देत भेट घडून देते असेही नंदाताई खैरे यांना सांगितले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *