प्रतिनिधी : दिपक वाबळे , देऊळगाव रसाळ – सुपे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित सुपे च्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास सहकारी परिवर्तन पॅनल विजय चा १३/०० ने ७०/८० मतांच्या फरकाने विजय झाला.

समोर असणाऱ्या भरत खैरे, जिल्हा परिषद सदस्य यांच्या पॅनलचा परिसरातील युवकांच्या पॅनेलने पराभव केला सुपे परिसरातील बहुतांश सोसायट्या बिनविरोध झाल्यानंतर सर्वांचे लक्ष परिसरातील मोठी व नामांकित असणाऱ्या सुपे विकास सोसायटी च्या निवडणुकीवर लागले होते दरवेळी राष्ट्रवादी विरुद्ध इतर पक्षाचा पॅनल अशी निवडणूक होत असे परंतु यावेळी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या विरुद्ध परिसरातील राष्ट्रवादीच्या युवकांनी बंड पुकारून त्यांना व त्यांच्या उमेदवारांना धूळ चारायचे काम केले, सुपे परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी सुपे विकास सोसायटी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला त्यात युवकांच्या पॅनल साठी तेरापैकी एक जागा देतो असे विधान करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य च्या उमेदवारांना चिटपट करण्याचे काम परिसरातील सोसायटीच्या मतदारांनी केले, परिसरात या विजयाची मोठी चर्चा होत आहे.

चार दिवसापूर्वी श्री अतुल खैरे यांचे मोठे बंधू कै. राहुल विलास खैरे यांच्या झालेल्या निधना नंतर सर्व विजयी उमेदवारांनी कुठलाही जल्लोष न करता हा विजय त्यांना समर्पित करत श्रद्धांजली वाहिली.

विजयी पॅनल चे नेतृत्व श्री अतुल विलास खैरे, अविनाश खैरे, मनोज मोहन खैरे , नितीन खैरे ,राजाराम खैरे,महेंद्र खैरे,गणेश खैरे, संजय खैरे,अभयसिह खैरे,अमित खैरे,मनोज खैरे,निलेश खैरे,सतीश खैरे, यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *