प्रतिनिधी – बारामती येथील भाजपा चे कार्यकर्ते प्रमोद डिंबळे यांची नुकतीच निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. भाजपाचे काम है शिस्तप्रिय काम म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितले जाते. सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाची गंगा पोचवून सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणणे हेच भाजपाचे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसून येत असते. बारामती शहरांमध्ये भाजपाचे काम वाढवण्यासाठी व संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी माझी सरचिटणीसपदी निवड केली असल्याचे नवनिर्वाचित सरचिटणीस प्रमोद डिंबळे पाटील यांनी सांगितले. भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गोविंद देवकाते, बारामती शहर अध्यक्ष सतीश फाळके, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे काम वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद डिंबळे पाटील यांनी माहिती दिली आहे..