प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी बारामती मा.सौ.सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 11/4/2022 रोजी बारामती तालुक्यातील निरावागज, जैनकवाडी, जराडवाडी, सायंबाची वाडी येथील महिला शेतकरी बचतगट यांनी कात्रज आंबेगाव, जि.पुणे येथील संतकृपा महिला गृह उद्योग उत्पादन विभाग तसेच सीज़न मॉल मगरपट्टा हडपसर याठिकाणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकानी व्यवस्थापक श्री. विशाल यादव यांनी उपस्थित महिला शेतकर्याना महिला बचतगटाचे व्यवसाय व बाजारातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व उत्पादन विभागाची प्रत्यक्षात भेट घडवून आणली. तालुका कृषी अधिकारी सौ.सुप्रिया बांदल यांनी महिलांना बचतगट व शेतीशाळा या अनुषंगाने एकत्र येऊन आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी गृह उद्योग व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन केले. यावेळी बारामती तालुक्यातील महिला कृषि सहाय्यक ज्योती गाढवे, मीरा राणे, माधुरी पवार, तृप्ती गुंड, मनिषा यादव व अहिल्या महिला शेतकरी बचतगट, राजमाता महिला शेतकरी बचतगट व ईयर महिला शेतकरी बहु संख्येने उपस्थित होत्या.