प्रतिनिधी- रक्तदान हेच जिवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असं समजल जात राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेशिंमधील साठा कमी पडू लागला आहे, हीच गरज लक्षात घेऊन समता परिषद ,बारामती, सावतामाळी तरुण मंडळ ,पणदरे आणि महात्मा फुले प्रतिष्ठान ,पणदरे या मंडळांनी काल दिनांक 10-04-2022 रविवारी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते ,या रक्तदान शिबिरात जवळजवळ 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला .

मुक्ताई ब्लड बँकेचे संचालक सौरभ ननवरे यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. कार्यक्रमाला अडवोकेट केशवबापू जगताप, समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, योगेश भैय्या जगताप, गुलाब आप्पा देवकाते ,स्वप्नील आण्णा जगताप ,राजेंद्रसिह ढवाण पाटील, सागर जाधव, तानाजीराव देवकाते, बन्सीलाल आटोळे , मंगेश जगताप ,गणेश जगताप ,प्रमोद शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच शिबीराच्या यशस्वीतेसाठी रमेश रासकर, चैतन्य बनकर, अभिजीत लोखंडे, अविनाश जमदाडे,गिरीष शिंदे , सुधाकर बनकर ,सुरज रासकर ,नागेश शिंदे ,संदीप हाळनोर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *