प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या बारामती येथील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील उपशिक्षिका सौ तृप्ती विलास कांबळे यांना आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर होताच शाहू हायस्कूल चे प्राचार्य श्री बी एन पवार यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने उपशिक्षिका सौ तृप्ती कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक माननीय श्री साळुंखे शिक्षक प्रतिनिधी श्री जी आर तावरे व इतर मान्यवर उपस्थित होते. सौ तृप्ती कांबळे या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गेले 19 वर्ष विज्ञान उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर होताच तृप्ती कांबळे यांना विविध स्तरातून क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या 4 ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन नेहमीप्रमाणे समारंभपूर्वक साजरा केला जात आहे. या निमित्त कर्मवीरांच्या हयातीत व नंतर विशेष योगदान दिलेल्या थोर व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ विभागाच्यावतीने विशेष कामगिरीसाठी शाळा विद्यार्थी शिक्षक यांना कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. सन 2021-2022 मध्ये निवड झालेल्या पारितोषिकांचे वितरण हे संस्‍थेच्‍या विभागीय सल्लागार मंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांनीही सौ तृप्ती कांबळे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *