प्रतिनिधी – वैष्णवी क्षिरसागर,- समतेचे कट्टर पुरस्कर्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मळद, तालुका बारामती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले सामाजिक प्रतिष्ठान मळद यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ, नामफलकाचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी नाईक या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नेते श्री राजकुमार पोतेकर बापू होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे म्हणाले.. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी सर्व जाती धर्मांना समतेचा आणि सन्मानाचा जो संदेश दिलेला आहे त्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. याप्रसंगी गावचे सरपंच श्री योगेश बनसोडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री शहाजी काका गावडे पाटील, तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्री रामचंद्र नाना मदने, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक श्रीसागर भोंगळे, माजी संचालक श्री जनार्दन दादा झांबरे, माजी सरपंच धनंजय भाऊ गवारे, श्री लालासाहेब गावडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रफुल्ल गावडे पाटील, श्री राहुल आटोळे, तानाजीराव वरे, पोलीस पाटील श्री गोविंदराव गावडे पाटील, श्री संतोष वरे, श्री सुनील काका सुभेदार, श्री नाना गावडे पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्याम उपाध्ये, किरण गावडे पाटील, त्र्यंबक आप्पा सातव, श्री शैलेश दादा पिसाळ, श्री कल्याण मोहिते, श्री विकास भोसले, सौ आशाताई दगडू लोंढे, श्री गणेश जगताप, श्री गोविंद कांबळे, श्री मारुती मेत्रे, यशवंत नाना शेंडे, दत्ता नाना शेंडे, जगु भाऊ शेंडे, श्री आनंद रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गावचे माजी उपसरपंच व संघटनेचे अध्यक्ष श्री युवराज नाना शेंडे आणि जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष किरण ढोक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोरोना काळात चांगले काम करणारांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी क्षीरसागर हिने केले. प्रास्ताविक एड, भोसले ताई यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चेतन शेंडे, तुषार शेंडे, कैलास ढोक, शरद शिरसागर, शिवानंद शेंडे, विठ्ठल लव्हे, अक्षय सुभेदार यांनी केले. आभार वैभव शेंडे यांनी मानले…. या कार्यक्रमात गावातील सर्व नेते मंडळी एका व्यासपीठावर आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सहभागी झाले होते.