या निवडणुकीत गाव पातळीवर एकोप्याचे दर्शन..

डोर्लेवाडी : झारगडवाडी सोसायटीची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा झारगडवाडी परिसरात रंगली होती. दरम्यान, सोसायटी चे चेअरमन प्रकाश बोरकर आणि छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, यांनी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून झारगडवाडी विविध विकास सोसायटीची
निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत गाव पातळीवर सर्वांबरोबर चर्चा करत एकोप्याचे दर्शन घडवत सोसायटी बिनविरोध करून दाखवली आहे. झारगडवाडी कार्यकारी सोसायटी मध्ये 13 जागेचे संचालक बोर्ड आहे. यामध्ये 5 जणांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती मात्र सर्वसाधारण मधील आठ जागेसाठी नऊ फॉर्म आल्याने निवडणूक लागतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मारूतराव साळुंखे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी या सोसायटीच्या निवडणूकीतून माघार घेत निवडणूक बिनविरोध केली यामुळे त्याचे सर्व संचालक आणि सभासदांनी यांचे आभार मानत मान्यवरांनी शाल आणि श्रीफळ देत त्याचे स्वागत केले.

यावेळी चेअरमन प्रकाश बोरकर, छत्रपतीचे संचालक नारायण कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बोरकर, माझी सरपंच नितीन शेडगे, प्रवीण बोरकर, मंजाबापू बोरकर, पोपट निकम, रमेश बोरकर, आबासो झारगड, बाळासाहेब निकम, संजय देवकाते, निलेश महाडिक, सचिव अंकुश बोरकर, पत्रकार प्रशांत तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

बिनविरोध निवड झालेले पुढीलप्रमाणे..
सर्वसाधारण – नवनाथ बोरकर, परशुराम बोरकर, राजेंद्र बोरकर, अंकुश निकम, बाळासाहेब कोळेकर, दशरथ झारगड, हौसराव मासाळ, सुरेश करे,
भटक्या जाती जमाती मधून सतीश कुलाळ, महिला राखीव रंजना बोरकर, सविता शेडगे, अनुसूचित जमा जमाती राजेंद्र सोनवणे ओबीसी मधून भिवाजी बनकर यांची बिनविरोध निवड झाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *