माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर पणदरे या ठिकाणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांना पुणे जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार देण्यात आला होता त्याअनुषंगाने व अश्विनी शरद कदम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवून पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते दशरथ दादा धुमाळ, मा चेअरमन खरेदी विक्री संघ, सुरेश मामा खलाटे, संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना, विलास बापू कदम, अतुल भैय्या जगताप सरपंच ग्रामपंचायत पवईमाळ ,पोपट काका कोकरे मा सदस्य ग्रामपंचायत धुमाळवाडी, शिरष्णे गाव चे राजाभाऊ जाधव, डि डि जगताप ,अश्विनी कदम चे पालक शरद कदम, आप्पासाहेब लोखंडे, सुरेश गुंजवटे, स्कूल च्या प्रिंसिपल शिवमती स्वरांजली विनोद जगताप ,संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप, व्हा प्रिंसिपल योगिता कांबळे, टिचर स्टाफ, विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत टिचर दिपाली शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप यांनी रोहिणी तावरे व अश्विनी शरद कदम ,मीनाक्षी तावरे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सांगवी – डोर्लवाडी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांनी स्कूल साठी कचरा कुंड्या ( Dustbin ) देऊन स्कूलला सहकार्य केले, तसेच इतर मान्यवर मंडळींनी महिला त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारपर आभार मध्ये रोहिणी तावरे व अश्विनी शरद कदम यांनी संकटांना सामोरे जाताना ध्येय,जिध्द ,चिकाटीच्या जोरावर तसेच कुटुंबातील सदस्य यांनी दिलेला पाठिंबा यामुळे आम्ही या पदापर्यंत पर्यंत पोहचलो व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर यांनी दिलेल्या कौतुकाची थाप कधीच विसरणार नाही ही ग्वाही देऊन स्कूलच्या प्रगतीचे कौतुक केले. आभार स्कूलच्या प्रिसिंपल स्वरांजली विनोद जगताप यांनी मानले