फौंडेशन मार्फत गेल्या 6 वर्षापासून राबविला जात आहे हा उपक्रम

बारामती (प्रतिनिधी, रियाज पठाण ) पारंपारिक पोषाख, वाद्याच्या तालावरचा ठेका , प्रचंड उत्साही वातावरणात पसरलेल्या चैतन्या बरोबरच आणखी एक गोष्ट बारामतीच्या शिवजयंती उत्सवात सगळ्याचे लक्ष वेधुन घेत होती, मिरवणुकीतील सहभागाने थकलेल्या मावळ्यानां श्रमपरिहार करण्यासाठी प्रेमाचा गारवा देत उभा असलेले मुस्लीम समाजातील काही तरुण यादगार सोशल फौंडेशनच्या माध्यमातून पाणी वाटप करत होते. ह्या कार्यक्रमात बारामतीचे डी. वाय. एस.पी. श्री.गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक श्री. सूनील महाडीक, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुनील शिंदे , बारामती नगर परिषदेचे गटनेते श्री. सचिन सातव, माजी नगरसेवक श्री.सिद्धनाथ भोकरे यांनी आपल्या शुभहस्ते मावळ्यांना पाणी बॉटल वाटप केल्या. विशेष म्हणजे मागील सहा वर्षापासून पाणी वाटपाचा उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित यादगार सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात येते.
फिरोज भाई बागवान यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *