( महिलांनी स्वतःच्या उन्नतीचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे – अस्मा शेख )

प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बेटी बचाव, बेटी पढाव ट्रस्टतर्फे समाजाच्या विविध घटकातील कर्तबगार महिलांचा विशेष पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अस्मा शेख, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर सदरील कार्यक्रमाचे आयोजन गुरमीत कौर – मान व डॉ.अजय दुबे यांनी केले होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अस्मा शेख म्हणाल्या, की महिलांनी आता स्वतःच्या उन्नतीचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे. सरकारी पातळीवर महिलांना उन्नत करण्यासाठी अनेक योजना सुरू आहेत पण त्याची माहितीच नसल्याने महिला त्यापासून वंचित राहतात. त्या योजनांची माहिती करून महिलांनी स्वतःचे कल्याण साधले पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, बेटी बचाव ट्रस्ट सारख्या संस्थांनी महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करणाऱ्या उपाययोजनाही केल्या पाहिजेत.

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी बेटी बचाव बेटी पढाव ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करून पुरस्कार विजेत्या महिलांच्या कार्याचाही गौरव केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रीती मोदी, रीटा शर्मा, ऍड. गीतांजली कदाटे, स्मिता सोंडे, कौसर खान, ज्योती मानकर, लक्ष्मी प्रसन्ना, वासुदेव शेखावत या आदींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *