अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा चेतना तर्फे शिबीराचे आयोजन..

प्रतिनिधी – युवा चेतना सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र अंनिस बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा चेतना सदस्यांसाठी व इच्छुक नागरिकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रशांत पोतदार, सातारा यांनी “जादूटोणा विरोधी कायदा” या विषयावर मार्गदर्शन केले. मिलिंद देशमुख, पुणे यांनी “चमत्कारामागील विज्ञान” या विषयावर सादरीकरण केले. नंदिनी जाधव, पुणे यांनी “स्त्रिया आणि शोषणाच्या बेड्या” या विषयावर व्याख्यान दिले. अनिल वेल्हाळ, पुणे यांनी “अंगात येणे, झपाटणे आणि मनोविकार” या विषयावर सादरीकरण केले. श्रीपाल ललवाणी, पुणे यांनी “अंनिसची धर्मविषयक भूमिका” यावर व्याख्यान दिले. या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशस्तीपत्रक, अंनिस वार्तापत्रचे अंक आणि महिलांच्या आरोग्याविषयी पुस्तके देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा चेतना सामाजिक संस्थेच्या मनोज पवार, प्रज्ञा काटे, सुषमा बनकर,
शिवांजली जगताप, पूनम देशमुख, निकिता भापकर, गौरी गुरव, रागिणी वसव, प्रियांका सासवडे, ऋतुजा घोलप, पूजा दीक्षित, विशाल लोणकर, सतीश पवार, जयदीप नागवडे यांनी आयोजन केले.
अंनिस बारामती तर्फे संयोजन समितीमध्ये प्रा.ज्ञानदेव सरोदे, हरिभाऊ हिंगसे, तुकाराम कांबळे, बाळकृष्ण भापकर, सुनील महामुनी, रंगनाथ नेवसे, दिनेश आदलिंग, भारत विठठलदास यांनी काम केले. नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन युवा चेतना संस्थेद्वारे करण्यात आले. भविष्यामध्ये देखील युवा चेतना मार्फत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य होईल अशी ग्वाही युवा चेतना सदस्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *