प्रतिनिधी – आज शिवजयंती निम्मित शिवराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकामात युवा नेते युगेंद्र दादा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तिचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी विश्वासराव देवकाते पाटील, सुभाष शेठ सोमाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, बबलू देशमुख, गणेश गायकवाड, सुधीर पाटसकर, प्रकाश पळसे, पराग साळवी, राहुल जाधव, राष्ट्रवादी महिला अनिता गायकवाड व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते. शिवराज्य प्रतिष्ठान बारामती यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर फुलाजी प्रभु देशपांडे, वीर रायाजी बांदल, वीर कोयाजी बांदल, वीर शिवा काशीद व बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘पावनखिंड’ चा हालता देखावा सादर केला आहे.
प्रतिष्ठानचे श्रीकांत जाधव, निलेश गायकवाड, चेतन (मुन्ना ) जाधव, अतिश गायकवाड, प्रशांत जगताप, सौरभ राठोड, प्रथमेश गायकवाड, सुमित शिकारे, केदार माळवे, गौरव जाधव, चेतन बा.जाधव, सोनु बामणे यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *